Description
Popular Prakashan Roopavedh by Srirama Lagu
परमेश्वराला रिटायर करा' अशा परखड शब्दांत आपली मते मांडणारा विचारवंत, आपल्या प्रत्येक भूमिकेचा अनेक अंगांनी विचार करत आपल्या अभिनयाची उंची वाढवत नेणारा नटसम्राट, 'An Actor should be an athelet philosopher' आणि 'You are the player, you are the instrument' हे दोन मंत्र जीवनात प्रत्यक्ष उतरवण्याचा कसोशीने प्रयत्न करणारा रंगकर्मी, केवळ नाटकच नव्हे तर साहित्य, संगीत अशा सर्वच कलांमध्ये रमणारा रसिक, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सामाजिक कृतज्ञता निधी, अंधःश्रद्धा निर्मूलन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांसारख्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणारा कार्यकर्ता... डॉ. श्रीराम लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे विविध पैलू. 'लमाण' या त्यांच्या आत्मचरित्रात प्रामुख्याने त्यांच्या नाट्यजीवनावर भर होता. 'रूपवेध' या पुस्तकात मात्र डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वातले इतर पैलू अधिक दृग्गोचर झाले आहेत. डॉ. श्रीराम लागू यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या विविधरंगी पैलूंवर प्रकाश टाकणारे त्यांचे लेख, भाषणे आणि मान्यवरांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखती यांचे संकलन 'रूपवेध' या पुस्तकात केले आहे.