Description
Popular Prakashan Aisa Gami Bramh by Narayan Surve
नारायण सुर्वे हे कामगार जीवनाशी केवळ समरस झालेले नव्हे, तर हे जीवन प्रत्यक्षात अनुभवलेले कवी आहेत. त्यांनी पुस्तकांच्या कपाटात आपली स्फूर्तिस्थाने शोधली नाहीत. सभोवारच्या परिसरात त्यांनी काही श्रद्धा जागत्या ठेवल्या आणि त्यातूनच त्यांनी आपल्या कवितेचा शोध घेतला. त्याची बरीचशी कविता लढाऊ वृत्तीची, समाजक्रांतीची उपासना करणारी, नव्या आनंदभुवनाचे स्वप्न पाहणारी आहे. प्रामाणिकपणा आणि उत्कटता ही उत्तम काव्याची आधारतत्त्वे सुर्वे यांच्या कवितेत आहेत हे ही कविता वाचताना सहज लक्षात येते.